शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया न करता कचरा टाकणाऱ्या मंगलकार्यालयांवर महापालिकेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:28 IST

कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे. 

पुणे : कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे शंभरपेक्षा अधिक लग्नाचे किंवा इतर सोहळ्यांसाठीचे हॉल, लॉन्स आणि मंगल कार्यालये आहेत. त्यात सध्या लग्न मुहूर्त जोरात आहेत. त्यामुळे अनेक कार्यालयांमधून अन्नपदार्थ, फुले, तांदूळ आणि इतर अनेक प्रकारचा कचरा जमा होतो. मात्र त्यात कोणतेही विभाजन केले जात नाही. त्यामुळे अर्थात महापालिकेला त्यावर प्रक्रिया करणे अवघड होत आहे. अनेकदा या कार्यालय व्यवस्थापनांना महापालिकेने सूचना केल्या होत्या. अखेर महापालिकेने आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे.  त्यातून ३७ हजार ५०० रुपये इतका दंड गोळा केला असून यापुढेही कारवाई सुरु असणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे. 

याबाबत घनकचरा विभागप्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले की, यापूर्वी महापालिकेने कार्यालयांना लेखी सूचना आणि नोटीसही बजावल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कार्यालयांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया आणि विभाजन न करणाऱ्या सोसायट्यांवरही महापालिका कारवाई करणार आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नmarriageलग्न