स्मार्ट सिटीला महापालिका देणार ४० कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:52+5:302021-09-02T04:24:52+5:30

पुणे : महापालिकेकडून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) देय असलेल्या ७२ कोटी रुपयांपैकी पहिल्या ...

Municipal Corporation will give Rs 40 crore to Smart City | स्मार्ट सिटीला महापालिका देणार ४० कोटी रुपये

स्मार्ट सिटीला महापालिका देणार ४० कोटी रुपये

पुणे : महापालिकेकडून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) देय असलेल्या ७२ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात ४० कोटी रुपये अदा करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली असून, कंपनीला नुकतीच दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे़ दरम्यान, स्मार्ट सिटीने २३ मार्च २०२१ ला महापालिकेकडून दर वर्षी देण्यात येणारा निधी मिळण्याबाबत पत्र दिले होते़ त्यानुसार महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीला निधी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता़ मात्र, हा विषय पुढे ढकलण्यात येत होता़ आजअखेर त्यास मान्यता देऊन ७२ कोटींपैकी ४० कोटी रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०१६ पासून आजपर्यंत महापालिकेने स्मार्ट सिटीला आपल्या हिश्श्यापोटी एकूण १०१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

Web Title: Municipal Corporation will give Rs 40 crore to Smart City