ब्रिटनहून पुण्यात आलेल्या त्या सहप्रवाशांचा महापालिका घेतेय माग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:15+5:302021-01-08T04:27:15+5:30

पुणे : कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आलेल्या त्या प्रवाशांसह अन्य कोणते प्रवासी विमानात होते, त्यापैकी ...

The Municipal Corporation is taking the demand of those fellow passengers who came to Pune from Britain | ब्रिटनहून पुण्यात आलेल्या त्या सहप्रवाशांचा महापालिका घेतेय माग

ब्रिटनहून पुण्यात आलेल्या त्या सहप्रवाशांचा महापालिका घेतेय माग

पुणे : कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आलेल्या त्या प्रवाशांसह अन्य कोणते प्रवासी विमानात होते, त्यापैकी किती जण पुण्यात आले व संबंधित बाधित किती जणांच्या संपर्कात आला याचा तपास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे़

ब्रिटनहून पुण्यात आलेल्या व कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढवणारा तो तरुण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे़ चौदाव्या व पंधराव्या दिवशी त्या तरुणाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने सोमवारी त्यास नायडू रुग्णालयातून घरी सोडले आहे़ मात्र, पुढील दहा दिवस त्याला घराबाहेर पडता येणार नाही़

दरम्यान, १ डिसेंबरपासून ब्रिटनहून विमानाने शहरात आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात असतानाच आता विशेषत: तो तरुण असलेल्या विमानातून १३ डिसेंबर रोजी मुंबईत अथवा पुण्यात अन्य कोणते प्रवासी आले आहेत का, त्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक मिळावेत असे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण विभागाकडे मागविली आहे़

Web Title: The Municipal Corporation is taking the demand of those fellow passengers who came to Pune from Britain