शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेनोरा, सिझन मॉलवर महापालिकेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:27 IST

शहरातील जाहिरातींसाठी महापालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना धोरण २००३ तयार केलेले असून त्यास राज्यशासनानेही मान्यता दिलेली आहे.

ठळक मुद्देशहरातील २२ मॉल धारकांना अनधिकृत जाहिरात प्रकरणात नोटीसामार्च अखेरपूर्वी परवाना शुल्क व दंड वसूल करण्यात येणार

पुणे : महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता सर्रास जाहिरातबाजी करणा-या अ‍ॅमेनोरा मॉल आणि सिझन मॉलवर थेट कारवाई करत सर्व जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले. शहरातील अशा २२ मॉलधारकांना नोटिसा बजविण्यात आल्या असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.     शहरातील जाहिरातींसाठी महापालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना धोरण २००३ तयार केलेले असून त्यास राज्यशासनानेही मान्यता दिलेली आहे. या मान्यतेनुसार, महापालिकेकडून शहरात जाहिरात करण्यास प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क आकारून मान्यता दिली जाते. या धोरणातील तरतूदीनुसार, शहरातील दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात योग्य पध्दतीने करता यावी यासाठी दुकानाच्या दर्शनी भागातील लांबीएवढी आणि ३ फूट उंचीची जाहिरात लावण्यास मुभा दिली जाते. मात्र, त्यासाठीही आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक आहे. परंतु शहरातील बहुतेक सर्व मॉल, हॉटेल्समध्ये आपल्याच इमारतीवर, समोरच्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी सुरु आहे. यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्व मॉलधारकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या, पण महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखविण्यात आली. अखेर आकाशचिन्ह विभागाच्या वतीने थेट कारवाई करत सर्व जाहिरात फलक जमीनदोस्त करून टाकले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती, असे दौंडकर यांनी सांगितले.------------- मार्च अखेरमुळे अधिक कडक कारवाईशहरातील विविध २२ मॉलच्या बाहेर अनधिकृतपणे जाहिरातबाजी सुरु आहे. या सर्व मॉलवर कडक कारवाई करून , मार्च अखेरपूर्वी परवाना शुल्क व दंड वसूल करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यानी स्पष्ट केले. महापालिकेला यामधून किमान १० कोटी रुपयांचा महसूल गोळा होईल, असे दौंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAdvertisingजाहिरात