शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूंच्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 20:21 IST

शहराच्या विविध रस्त्यांवरील पथदिवे, बल्ब, खांब, जाळ्या, बॉक्सेस, वायर्स, लोखंडी वस्तू आदी वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत.

ठळक मुद्देपालिकेकडून तक्रारींबाबत औदासिन्य : कोट्यवधींचे साहित्य दरवर्षी होतेय लंपास 

पुणे : महापालिकेकडून शहराच्या सुशोभिकरणासाठी बसविलेल्या वस्तूंच्या सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण झाले आहेत. विविध रस्त्यांवरील पथदिवे, बल्ब, खांब, जाळ्या, बॉक्सेस, वायर्स, लोखंडी वस्तू आदी वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींची चोरी होत असल्याने त्याकडे विशेष गांभियार्ने पाहिले जात नाही. मात्र, त्याची गोळाबेरीज कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून विविध विकासकामे केली जातात. पथदिवे बसविण्यापासून ते सुशोभिकरणावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र, या वस्तू चोरीला जात असल्याने पालिकेच्या अधिकाºयांची डोकेदुखी वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये, मुताºयांमध्ये बसविलेल्या ट्यूब लाईट्स, बल्ब आणि वायर्स चोरुन नेल्या आहेत. तर रस्त्यांवर ठेवण्यात आलेले विद्यूत खांबही चोरटे लांबवत असल्याचे चित्र आहे. गर्दुल्ले आणि दारुड्यांकडून या चोऱ्या अधिक प्रमाणात केल्या जात आहेत. काही ठिकाणच्या तर महागड्या फरशाच गायब करण्यात आलेल्या आहेत. नाम फलक, लोखंडी पाट्या, पाट्या लावण्यासाठी उभारलेले अ?ँगल्स, पुतळ्यांभोवतीच्या लोखंडी जाळ्या, सुशोभिकरणासाठी लावलेल्या लोखंडी चेन, रस्ता दुभाजक म्हणून वापरण्यात येत असलेले प्लास्टीक पोलार्डही चोरटे लंपास करीत आहेत. महापालिकेजवळील छत्रपती शिवाजी पुलावर ब्रिटीश कालीन पद्धतीचे रेलींग बसविण्यात आलेले होते. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पुलाचे सौंदर्य वाढविण्यासाठी ब्रिटीश कालीन पद्धतीचे पथदिवे बसविण्यात आले. मात्र, त्यानंतर काही दिवसातच हे रेलींग चोरीला जाण्यास सुरुवात झाली. वर्दळीच्या या रस्त्यावरील रेलींगचा एक एक तुकडा गायब होऊ लागला. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करीत एका चोरट्याला पकडले होते. मात्र, त्यानंतरही ही चोरीच सुरुच राहीली. सध्या येथील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रेलींग शिल्लक राहिलेले आहेत. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्येही हीच समस्या आहे. ====पालिकेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना बसण्यासाठी स्टील तसेच लोखंडी बाकडे पुरविण्यात येतात. मात्र, यातील बहुतांश बाकडी जागेवर नाहीत. यातील काही बाकडी चोरीला गेल्याची शक्यता आहेत, तर काही बाकडी खासगी वापरासाठी गायब करण्यात आलेली आहे. चोरीचे बाकडे विकत घेणारे काही ठराविक भंगार व्यावसायिक शहरात आहेत. त्यांच्या दुकानांची पालिकेचे अधिकारी ना चौकशी करतात, ना तपासणी करतात. ====पालिकेच्या एकूण पसाऱ्यामध्ये चोरीला या जाणाऱ्या या वस्तू अगदी छोट्याशा वाटतात. मात्र, सातत्याने चोरी होत असलेल्या वस्तूंची किंमतीची गोळाबेरीज केल्यास हा आकडा कोट्यवधींच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून या चोऱ्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारी देण्याचे प्रमाणही अत्पल्प आहे. त्यामुळे पालिकेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई होत नाही.            

टॅग्स :PuneपुणेThiefचोरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका