जादा दरामुळे होणार महापालिकेचे नुकसान
By Admin | Updated: September 5, 2014 00:55 IST2014-09-05T00:55:31+5:302014-09-05T00:55:31+5:30
डासांच्या प्रतिबंधासाठी औषध फवारणी करण्याच्या कामासाठी कमी दराची निविदा डावलून जादा दराच्या निविदाधारकाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

जादा दरामुळे होणार महापालिकेचे नुकसान
पुणो : डासांच्या प्रतिबंधासाठी औषध फवारणी करण्याच्या कामासाठी कमी दराची निविदा डावलून जादा दराच्या निविदाधारकाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार असल्याने जादा दराची मंजूर निविदा रद्द करावी. तसेच, नव्याने फेरनिविदा काढण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आज करण्यात आली.
आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक विभागातील इनडोअर व्हेक्टर कंट्रोल प्रोग्रॅम राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या ठिकाणी व टाकीचे पाणी काढणो, त्यानुसार किटकांचा प्रादुर्भाव होणारी ठिकाणो शोधून औषध फवारणी करणो, यासाठी पाच ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. मात्र, केंद्र शासनाच्या नियमानुसार आरोग्य व स्वच्छता विभागासाठी सेवाकराची अट नाही. त्याविषयी अनभिज्ञ असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन निविदाधारकांनी सेवाकर भरला नसल्याने त्यांच्या निविदा अपात्र ठरविल्या. तर सेवाकरासह जादा दराची निविदा असलेल्या निविदाधारकांना पात्र ठरविले होते. मात्र, स्वयंसेवी संस्थांनी ही चूक लक्षात आणून दिली. तसेच, नगरसेविका दीपाली ओसवाल यांनी आक्षेप घेत फेरप्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. मात्र, जादा दराच्या निविदाधारकाला सेवाकर वगळून
काम दिले. त्यावरून संबंधित निविदेत
काही नगरसेवक व अधिका:यांचे हितसंबंध गुंतल्याचे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)
4आरोग्य विभागाशी संबंधित कामांना सेवाकराची सवलत असल्याचा प्रकार उजेडात आला. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने व स्थायी समितीने जादा दराच्या ठेकेदारावर मेहेरबानी दाखविल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य अनिल राणो यांनी आयुक्त कुमार यांना संबंधित निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचे पत्र आज दिले. त्यामध्ये महापालिकेच्या नियमानुसार सेवाकरासाठी कमी दराच्या निविदा अपात्र ठरवून जादा दराच्या निविदेला कोणत्या नियमातून मान्यता दिली, त्याविषयीचा खुलासा करण्याचे व दिशाभूल करणा:या अधिका:यांवर कारवाईची मागणी केली.