शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका सुरू करणार 'टेली मेडिसिन' सुविधा; खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 13:08 IST

डॉक्टर व्हिडिओ कॉलिंगद्वारे रूग्णांची विचारपूस करून वैद्यकीय सल्ला देण्याचे काम करतात. त्यासाठी आकारली जाणारी रक्कमही तशी मोठी आहे. 

ठळक मुद्देकमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष२४ बाय ७ कोरोनासंदर्भात वैद्यकीय सल्ला आणि मदत देण्याचे काम सुरू राहणार

पुणे : घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना फोनवरून वैद्यकीय सल्ला देण्याचा धंदा काही खासगी रुग्णालयांनी सुरू केला आहे. महापालिकेने त्याच धर्तीवर नागरिकांसाठी मोफत 'टेली मेडिसिन'ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष त्याकरिता निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणाहून २४ बाय ७ कोरोनासंदर्भात वैद्यकीय सल्ला आणि मदत देण्याचे काम सुरू राहणार आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शानुसार ज्या रुग्णांना घरामध्ये राहून उपचार घेणे शक्य आहे अशा रुग्णांना गृह विलगिकरणात राहून उपचार घेण्याची अनुमती पालिकेकडून देण्यात आली आहे. लक्षणे असलेले आणि नसलेले बरेचसे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्याकरिता काही निकषही ठरवून देण्यात आले आहेत. तसेच, त्या निकषांचे पालन होते की नाही हे पाहण्याची यंत्रणाही लावण्यात आली आहे. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला, त्यांची तपासणी आणि विचारपूस, औषधांची माहिती व समुपदेशन देण्याची ऑनलाईन सुविधा विविध खासगी रुग्णालयांनी सुरू केली आहे. त्यासाठी दीड हजार ते दोन हजार रुपये एका ऑनलाईन कॉलकरिता आकारले जात आहेत. डॉक्टर व्हिडिओ कॉलिंगद्वारे रूग्णांची विचारपूस करून वैद्यकीय सल्ला देण्याचे काम करतात. त्यासाठी आकारली जाणारी रक्कमही तशी मोठी आहे. 

आता हीच सुविधा महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पालिकेच्याच कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना लॅपटॉपसह इंटरनेट कनेक्शन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना पालिकेच्या या 'टेली मेडिसिन' सेंटरचा नंबर दिला जाणार असून रुग्ण थेट फोन करून माहिती घेऊ शकणार आहेत. येथील डॉक्टर्स व्हिडिओ कॉलिंगद्वारे रुग्णांशी संपर्कात राहणार असून त्यांच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवणार आहेत. 

तसेच, रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मदतही दिली जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. खासगी रुग्णालयांच्याच बरोबरीने पालिकेची आॅनलाईन यंत्रणा उभी राहणार असून नागरिकांना खासगी रुग्णालयात आॅनलाईन सल्ल्याकरिता पैसे मोजण्याची आवश्यकता भासणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर