महापालिका खर्चातून नगरसेविकांचे उड्डाण?
By Admin | Updated: November 11, 2014 00:34 IST2014-11-11T00:34:22+5:302014-11-11T00:34:22+5:30
ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम) येथे महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य व नगरसेविकांसाठी अभ्यास दौ:याचे आयोजन करण्याचे पत्र पाठविले आहे.

महापालिका खर्चातून नगरसेविकांचे उड्डाण?
पुणो : ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम) येथे महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य व नगरसेविकांसाठी अभ्यास दौ:याचे आयोजन करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार 9 व 1क् डिसेंबरला होणा:या दौ:यासाठी महापालिकेला 75 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
अभ्यास दौ:याला नगरसेविका विमानाने जाणार असल्याने त्यासाठी तब्बल 75 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेच्या खर्चातून अभ्यास दौ:याच्या नावाखाली सहल केली जात असल्याने यापूर्वीचे अनेक प्रस्ताव वादग्रस्त ठरले होते. त्या वेळी भाजपाच्या नगरसेविकांनी महापालिकेच्या खर्चातून दौरे करण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव आल्यास नगरसेविका काय भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
त्रिवेंद्रम अभ्यास दौ:यात पत्र आले आहे. परंतु, महिला बालकल्याण समितीमध्ये या विषयांवर अद्याप चर्चा अथवा निर्णय झालेला नाही.
- सुनंदा देवकर,
अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती