पालिकेची बाग ‘आओ जाओ घर तुम्हारा’!
By Admin | Updated: June 25, 2014 00:26 IST2014-06-25T00:26:15+5:302014-06-25T00:26:15+5:30
पालिकेने उभारलेल्या बागांमध्ये सध्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे.

पालिकेची बाग ‘आओ जाओ घर तुम्हारा’!
>सुरक्षा व्यवस्था नाही : मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयासमोरील बागेची स्थिती
पुणो : पालिकेने उभारलेल्या बागांमध्ये सध्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे. मराठवाडा मित्र मंडळासमोरील बागेत सुरक्षा व्यवस्थाच नसल्याने दिवस-रात्र ही बाग उघडी असून रात्री येथे अपप्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या उद्यान विभागाच्या प्रमुखांना याची काहीच माहिती नाही.
शहरातील बागांमध्ये नागरिकांनी येण्यासाठी ठराविक वेळ ठरवून दिलेली असते. मात्र हा नियम मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयासमोरील बागेला लागू होत नाही. या बागेचे एक प्रवेशद्वार मराठवाडा महाविद्यालयासमोर आहे तर दुसरे प्रवेशद्वार प्रभात रस्त्याच्या बाजूला आहे. मात्र या दोन्ही प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षकच नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे बाग बंदच केली जात नाही. आजूबाजूच्या परिसरातील टारगट मुले या बागेत बसलेली असतात. अनेकदा येणा:या मुलींची छेडछाडही काढली जाते.
प्रवेशद्वारावर सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 बाग चालू राहिल अशी पाटी लावलेली आहे. मात्र ही वेळ केवळ फलकापुरतीच राहिली आहे. (प्रतिनिधी)
बागेमधील जाळीचे कुंपन, दिव्याबत्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि बागेमध्ये महिला व पुरूष सुरक्षा रक्षक नेमण्यात येईल. या बागेची मी अजून पाहणी केलेली नाही. मात्र लवकरच पाहणीही करण्यात येईल.
- तुकाराम जगताप, मुख्य उद्यान अधिक्षक, पुणो महापालिका
मी नेहमी या बागेत चालण्यासाठी येतो. येथे काही ठिकाणी दिवाबत्ती नसल्याने चालतान त्रस सहन करावा लागतो. तसेच उद्यानाच्या नियमानुसार उद्यानाची वेळे ही पाळली गेली पाहिजे. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढली पाहिजे.
- दीपक देशपांडे, बागेत फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक