महापालिकेची साफसफाई रॅली
By Admin | Updated: October 13, 2015 01:19 IST2015-10-13T01:19:54+5:302015-10-13T01:19:54+5:30
पुणे महानगरपालिका वारजे - कर्वेनगर कार्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान व निबंध स्पर्धा घेण्यात आली.

महापालिकेची साफसफाई रॅली
कोथरूड : पुणे महानगरपालिका वारजे - कर्वेनगर कार्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
स्वच्छता मोहीम, स्वच्छ दौड, स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यान महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक असे एकूण ३०० विद्यार्थिनी, कमिन्स इंडिया लि. या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, मुकादम तसेच अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी आदी यात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक जी. के. पाथारे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.
या वेळी वारजे - कर्वेनगर कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त उमेश माळी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश अगरवाल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, आरोग्य निरीक्षक ऋतुराज दीक्षित, प्रिती भांडगे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजू येनपुरे, किरण गुरव, अनिल लोखंडे, अरुण थोरात, अंकुश साठे, कैलास वेडेपाटील, मनोज साखळे, अण्णा ढावरे यांच्यासह कमिन्स इंडिया लि. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)