महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:11 IST2021-05-22T04:11:12+5:302021-05-22T04:11:12+5:30

पुणे : ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनामुळे गुरुवारी रात्री निधन झाले़ ते ...

Municipal Assistant Commissioner Dayanand Sonkamble passed away | महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे निधन

महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे निधन

पुणे : ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनामुळे गुरुवारी रात्री निधन झाले़ ते ५६ वर्षांचे होते़ त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

ताडीवाला रोड परिसरात राहून सोनकांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले होते. पुणे महापालिकेत नोकरी करीत असताना ते महापालिका सहायक आयुक्त पदापर्यंत पोहोचले होते. त्यांनी करआकारणी व कर संकलन विभागात, महापालिका आयुक्त कार्यालय व अन्य कार्यालयामध्ये काम केले होते. ते मनमिळाऊ व शांत स्वभावाचे व चांगले काम करणारे अधिकारी म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्गात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती.

Web Title: Municipal Assistant Commissioner Dayanand Sonkamble passed away