पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी हिला सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तिची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, तिने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ डिसेंबरला तपास अधिकारी म्हणणे सादर करणार आहेत.
मुंढवा येथील बोटॅनिकल गार्डनची ४० एकर जमीन परस्पर पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीला विकल्याप्रकरणी कथित कुलमुखत्यार शीतल किसनचंद तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील, तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले आदी आरोपींविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शीतल तेजवानीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी तपासातील प्रगती न्यायालयासमोर सादर केली. मात्र, ती तपासाला सहकार्य करत नाही. त्यासाठी तेजवानीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अमित यादव यांनी केली.
मुंढवा येथील सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकताना सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तेजवानीला ताब्यात घेतले जाणार आहे. त्यासाठी बावधन पोलिसांनी न्यायालयात 'प्रॉडक्शन वॉरंट' अर्ज सादर केला आहे.
दिग्विजय पाटील अखेर पोलिसांना शरण
पिंपरी (पुणे) : पुण्यातील मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात अखेर अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार असलेला मामेभाऊ दिग्विजय पाटील सोमवारी बावधन पोलिसांसमोर हजर झाला. बावधन पोलिसांकडून पाटील याची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
या प्रकरणातील दस्त नोंदणी स्वींद्र तारू याच्या अधिकारात झाल्याने त्याला भोर येथील राहत्या घरातून ७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत वाढविली.
Web Summary : Sheetal Tejwani, accused in the Mundhwa land scam, remanded to judicial custody. She applied for bail; hearing on December 19. Parth Pawar's partner, Digvijay Patil, surrendered to police. Investigation continues into the fraud involving government land.
Web Summary : मुंढवा भूमि घोटाले में आरोपी शीतल तेजवानी को न्यायिक हिरासत में भेजा गया। उन्होंने जमानत के लिए अर्जी दी; सुनवाई 19 दिसंबर को। पार्थ पवार के भागीदार, दिग्विजय पाटिल ने पुलिस के सामने आत्मसमर्पण किया। सरकारी जमीन से जुड़े धोखाधड़ी की जांच जारी है।