शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 22:06 IST

कामशेत बोगद्याच्या तोंडावर ९ च्या सुमारास घडली घटना, दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू

Mumbai Pune Expressway traffic jam, landslide: गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होतानाच्या बातम्या येत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईपुणे एक्स्प्रेस वे वर देखील दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदाच्या तोंडावर दरड कोसळली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दरडीचे दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

कामशेतचा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही दरड कोसळली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाल्याचे चित्र आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणारा रस्ता सुरू करण्यात आला होता. दरड कोसळण्याच्या घटना पाहता, गेले दोन दिवस या मार्गावर दुपारी २-२ तासांचे ब्लॉक घेऊन काम करण्यात आले आहे. पण तरीही आज रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे. सध्या महामार्गावरील देवदूत यंत्रणा आणि आय आर बी चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मार्गावर आलेले दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आठ ते सव्वा आठच्या सुमारास दरड कोसळली. मात्र एक लेन सुरू असून आयआरबी च्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही दरड हटवून वाहनांसाठी रस्ता सुरळीत करण्यात येईल. - महामार्ग पोलीस

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईTrafficवाहतूक कोंडीlandslidesभूस्खलन