मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर क्वॉलिस - डंपरच्या अपघातात ६ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 20:01 IST2015-09-21T18:19:48+5:302015-09-21T20:01:53+5:30
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूरजवळ क्वॉलिस गाडी व डंपरच्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर क्वॉलिस - डंपरच्या अपघातात ६ ठार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २१ - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूरजवळ क्वॉलिस गाडी व डंपरच्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील धोंडे कुटुंबीय क्वॉलिस गाडीतूून गणपतीनिमित्त पुण्यात गेेले होते. सोमवारी पुण्यातून परतत असताना खालापूरजवळ धोंडे कुटुंबीयाच्या गाडीने विरुद्ध दिशेने येणा-या डंपरला धडक दिली. क्वालिस भरधाव वेगात होती व चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या भीषण अपघातात धोंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत.