शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची 'लुकआऊट नोटीस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 20:07 IST

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (mumbai cruise drugs case) साक्षीदार किरण गोसावी हा चर्चेत आला. तेव्हा हे जुने प्रकरण समोर आले आहे.

पुणे : क्रुज पार्टीतील आर्यन खान ड्रग्ज (aaryan khan case) प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी (kiran gosavi) हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला लुकआऊट नोटीस काढण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (mumbai cruise drugs case) साक्षीदार किरण गोसावी हा चर्चेत आला. तेव्हा हे जुने प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. मात्र, त्यात तो अजूनही फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी या गुन्ह्यात त्याचा शोध सुरु केला असून त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.

दिल्ली पोलीसही किरण गोसावीच्या शोधात

किरण गोसावी याने माझ्यासह अनेकांची फसवणूक केली असून दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत असल्याचे चिन्मय देशमुख याने सांगितले. चिन्मय देशमुख म्हणाले, की त्याने आम्हाला मलेशियामध्ये नोकरी देतो, म्हणून टुरिस्ट व्हिसावर पाठविले. माझ्यासह आणखी ५ ते ७ तरुण होते. नंतर वर्क व्हिसा देतो, असे सांगितले होते. मात्र, त्याने कोणालाही नोकरी दिली नाही. किरण गोसावी याच्याकडून फसवणूक झालेले हे तरुण माझ्या संपर्कात आहेत. दिल्लीमध्येही त्याने काही जणांची फसवणूक केली असल्याने दिल्ली पोलीसही त्याच्या शोधात आहेत.

टॅग्स :PuneपुणेAryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी