शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बहुउद्देशीय भवनाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:28 AM

पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून बाणेर रस्त्यावर सिंजेंटा कंपनीच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय भवनाची अर्धवट काम व प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भवन आणि त्यातील सुविधांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे

बाणेर : पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून बाणेर रस्त्यावर सिंजेंटा कंपनीच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय भवनाची अर्धवट काम व प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भवन आणि त्यातील सुविधांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करदात्यांच्या पैशाचा अपहार झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत असून, स्लॅब लिकेजमुळे इमारतीच्या आतून काळ्या रंगाच्या बुरशीसह सर्वत्र ओल पसरली आहे. इमारतीच्या दोन्ही मजल्यांवरील अनेक कापडी पडदे गायब असून सर्वत्र कचरा व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहाची सर्व कामे अपूर्ण असून टेरेसवरील वॉटरप्रूफिंगचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे ज्या उद्देशातून, विचारातून व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून हे भवन बांधण्यात आले होते. त्या भवनाची सध्याची अवस्था लक्षात घेता भवनाचा उद्देश मागे पडला आहे.भवनाचे काम सध्या अर्धवट स्थितीत जरी असले तरी उद्घाटन मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उरकले असल्याचे दिसून येत आहे. भवनाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात आला असून, रात्री असामाजिक तत्त्वांकडून जुगार व मद्य पार्ट्या येथे होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एकूणच भवनाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही वास्तू असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात आली आहे. दरम्यान, भवनाची सर्व अर्धवट कामे पूर्ण करून, सुरक्षा व्यवस्था तैनात करून, नियमित स्वच्छता ठेवून या वास्तूचा उपयोग होण्याच्या दिशेने पालिका प्रशासनाने उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.बहुउद्देशीय भवनाचे फाटक, प्रवेशद्वार उघडे असल्याचे निदर्शनास आले असून, या भवनात कोणत्याही वेळी कोणीही प्रवेश करू शकतो आणि वाईट गोष्टी या ठिकाणी घडू शकतात. संपूर्ण भवनाचा परिसर खुला असल्यामुळे चकाट्या मारण्याचे हे केंद्र बनले असल्याचे दिसूनयेत आहे.>विकासकामे उत्तम दर्जाची व्हावी, यासाठी कंत्राटदारांकडून यापुढील काळात सुधारणा अपेक्षित आहे. जे कंत्राटदार निकृष्ट कामे करतील, त्यांची बिले रोखली जातील. बहुउद्देशीय भवनाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून गुण नियंत्रक (क्वालिटी कंट्रोल) यांनी कामाची तपासणी करावी, अशी मागणी मी संबंधित विभागाकडे करणार आहे.- स्वप्नाली सायकर,नगरसेविका