शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

'खतरनाक' धाडस; चित्रपटाच्या गाण्यात चक्क खरे गुन्हेगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 22:15 IST

प्रवीण तरडे यांचा आगामी 'मुळशी पॅटर्न' चित्रपट वादात 

पुणे : चित्रपटांमध्ये पात्र खरी वाटण्यासाठी अनेकदा मेहनत घेतली जाते. मात्र आगामी मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात चक्क खऱ्या गुन्हेगारांना घेऊन गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात काही गुन्हेगार दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून हा चित्रपट वादात अडकण्याची शक्यता आहे.मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' या गाण्यात काही खरे गुन्हेगार आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जमिनीचे भाव वाढल्याने वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा ती विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर हा चित्रपट बेतलेला आहे. यातील 'आरारारा' या गाण्यात तलवारीने केक कापताना चित्रीत करण्यात आलेले दृश्य कुख्यात गुन्हेगार अमोल शिंदे याच्या व्हिडिओवरुन प्रेरित आहे. याच टिजरमध्ये राखाडी रंगाचा शर्ट घातलेला विठ्ठल शेलार दिसत असून त्याच्या पाठोपाठ केशरी शर्टमध्ये अमोल शिंदे दिसत आहे.विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथे राहणारा असून मारणे टोळीसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. तशी नोंददेखील पोलिसांकडे आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खून केला असून खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अमोल शिंदे हादेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अमोल शिंदे वातूनडे गावात सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात ३ तर हिंजवडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. यात पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून तसेच दरोडा आणि दंगलीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या गुन्हेगारांना घेऊन चित्रीत केलेल्या या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गणेशोत्सव काळात हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. 10 दिवसात 11 लाख लोकांनी हे गाणे यु- ट्यूबवर बघितले होते. 

टॅग्स :Pravin Tardeप्रवीण तरडेcinemaसिनेमा