शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू, होळीच्या दिवशी घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:07 IST

मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

पौड : मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अजय परशुराम घोडके (वय २२, रा. पाषाण) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा मृतदेह एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी धरणाबाहेर काढला.या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी पंकज मोरे यांनी पोलिसांना दिली. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु अंधार पडल्याने त्याचा शोध घेता आला नव्हता. गुरुवारी पोलीस, एनडीआरएफचे जवान व मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक अजयचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. पाषाण येथील रहिवासी अससलेला अजय हा एका कुरियर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. दुपारी २ ते ३ च्या सुमारास तो मित्रांसोबत मुळशी खुर्द गावाच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी उतरला. पाण्यात बराच आत गेल्याने पोहताना त्याला दम लागल्याने तो बुडाला.मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते व एनडीआरएफच्या शोधपथकाने गुरुवारी दिवसभर शोध घेतल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास अजयचा मृतदेह सापडला. यावेळी पौडचे पोलीस उपनिरीक्षक लवटे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे