शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुळा, मुठा, पवना नद्यांचे जल

By admin | Updated: December 22, 2016 02:39 IST

मुंबईत राजभवनाजवळील समुद्रात जागतिक दर्जाचे श्री छत्रपती शिवाजीमहाराजारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यानुसार

पिंपरी : मुंबईत राजभवनाजवळील समुद्रात जागतिक दर्जाचे श्री छत्रपती शिवाजीमहाराजारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी (दि. २४) शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक़्रम होत असून, या कार्यक्रमासाठी इंद्रायणी, पवना, मुळा व मुठा या नद्यांचे जल नेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामधून पवित्र इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. या नद्यांचे जल आणि मृदा (माती) गुरुवारी, २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता कलशामध्ये जमा केले जाईल. शहरातील विविध ठिकाणच्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यांजवळ कार्यकर्ते एकत्रित येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. शुक्रवारी पहाटे मंडलाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जलकलश रथ मुंबईकडे रवाना होईल. रथाबरोबर शहरातील शेकडो भाजपा कार्यकर्ते व नागरिक मुंबईत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. देशभरातून आलेल्या या मंगलकलशांची मिरवणूक काढून सायंकाळी ५.३० वाजता गेट वे आॅफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगलकलश सुपूर्द केला जाणार आहे. मुंबईतील या सोहळ्याचे प्रक्षेपण शहरातील नागरिकांना पाहता यावे, याकरिता दुपारी एकला प्रमुख चौकांमध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, अमोल थोरात, बाबू नायर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)