बहुप्रतीक्षित रस्त्याचे काम मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:40+5:302021-03-04T04:17:40+5:30
तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाळुंगे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ...

बहुप्रतीक्षित रस्त्याचे काम मार्गी लागणार
तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाळुंगे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी माजी सभापती चंद्रकांत इंगवले, लीलाधर तुपे, विनोद महाळुंगकर, विनायक तुपे, दत्तात्रय भोसले, दशरथ गायकवाड, नारायण जावळे, सुनील मिंडे, विनायक महाळुंगकर, चंद्रकांत भांगरे, बाबूराव माताळे, संतोष भोसले माजी उपसरपंच विशाल भोसले, अनिल वाळके, अनिल गायकवाड, राजेंद्र इंगळे इनामदार, विशाल भालेराव, अशोक शिवळे पाटील, कैलास भोसले, केवल भालेराव, शैलेश गायकवाड उपस्थित होते.
खेड तालुक्यातील बहुचर्चित सर्वांचे लक्ष लागून असलेली महाळुंगे येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १७ पैकी ८ उमेदवार निवडून आले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण महाळुंगकर, नितीन फलके, मनोज इंगवले, पांडुरंग काळे, वैशाली जावळे, पल्लवी भालेराव, जयश्री वाळके, दीपाली भोसले या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक भाषण महाळुंगे गावातील अध्यात्मिक सामाजिक चळवळीचे प्रणेते विनायक तुपे यांनी केले.
तसेच युवा कार्यकर्ते महाळुंगे येथील माजी उपसरपंच शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते विशाल भोसले यांनी शिवसेनेला रामराम ठोकत सद्गुरू पॅनेलच्या असंख्य ज्येष्ठ व युवक कार्यकर्त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खेड तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख विनोद महाळुंगकर पाटील, व आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक चंद्रकांत इंगवले यांनी केले. महाळुंगे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.