शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Raj Thackeray : मृत्यूंजय, राजा शिवछत्रपती... राज ठाकरेंनी घेतली ५० हजारांची २०० पुस्तकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:04 IST

पुण्यात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देत पुस्तकांची खरेदी केली.

मनसे प्रमुखराज ठाकरे गेल्या २ महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. हिंदुत्त्वाची भूमिका, भोंग्याचा वाद आणि अयोध्या दौऱ्यामुळे ते माध्यमांचे आकर्षणही ठरत आहेत. स्पष्टवक्ते आणि परखडपणे बोलणारं व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे. याशिवाय त्यांचं पुस्तक प्रेमही सर्वांना ठाऊक आहे. मंगळवारी सायंकाळी शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुस्तकांच्या दुकानाकडे धाव घेतली. अक्षरधारा बुक गॅलरी या ठिकाणी भेट देत त्यांनी ५० हजार रुपयांच्या तब्बल दोनशे पुस्तकांची खरेदी केली. त्याच्या या पुस्तक खरेदीमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे. 

मंगळवारी अक्षरधारा बुक स्टॉलमध्ये बसून राज ठाकरे यांनी निवांत पुस्तकं चाळली. तसंच त्या ठिकाणाहून परतताना त्यांनी त्यांनी तब्बल ५० हजार रुपयांच्या पुस्तकांची खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांनी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. यावेळी त्यांनी थोडा थोडका नाही, तर तब्बल दीड तास पुस्तकांच्या सानिध्यात घालवला. ऐतिहासिक, सामाजिक, आत्मचरित्र अशा अनेक प्रकरातील २०० पुस्तकं राज ठाकरे यांनी आपल्या बुक शेल्फसाठी निवडली. Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल“राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट दिली. त्यांनी जवळपास दीड तास सर्व विषयांची पुस्तकं पाहिली. त्यांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पुस्तकंही घेतली. चरित्र, आत्मचरित्र, सामाजिक विषयाची पुस्तकं, कलाविषयक पुस्तकंही त्यांनी विकत घेतली. जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा अधिक २०० पुस्तकं त्यांनी घेतली,” अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी दिली. अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात होती. परंतु त्यापैकी काही हरवली किंवा त्यांनी कोणाला भेट दिली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती, इतिहासकार सरदेसाई यांचे मराठी रियासत, वा सी बेंद्रे यांचा संपूर्ण संच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती, यातील काही पुस्तके राज ठाकरे यांच्याकडे हो परंतु त्यांना नव्याने ही पुस्तके खरेदी करायची होती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणे