एमपीएससीचे विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:10 IST2021-04-06T04:10:59+5:302021-04-06T04:10:59+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत शनिवारी आणि रविवारी कडक निर्बंध लावले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक ...

एमपीएससीचे विद्यार्थी संभ्रमात
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत शनिवारी आणि रविवारी कडक निर्बंध लावले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक देखील बंद राहणार आहे. एमपीएससीची संयुक्त गट ‘ब’ पूर्व परीक्षा ११ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत होणार आहे. कडक निर्बंधांमुळे परीक्षा होणार की पुढे जाणार या चर्चेमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच कोरोनामुळे शहरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांना लक्षणे दिसून येत आहे.
कोरोनामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला असून भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्याने आधीच विद्यार्थी त्रासले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. परीक्षा होणार की नाही, अशी विद्यार्थ्यांमद्ये चर्चा रंगू लागली आहे.
या अडचणींचा करावा लागणार सामना
- रविवारी राज्यात कर्फ्यु असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी अडचणींचा सामना
करावा लागणार
- त्या दिवशी नाश्त्याचे, जेवणाचे ठिकाण बंद असतील, राहण्यासाठी हॉटेल व लॉज ही ठिकाणे देखील बंद रहाणार आहेत.
- अनेक विद्यार्थी कोरोनो पॉझिटिव असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेत मुकावे लागणार.
- परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचले तर परीक्षेस मूकण्याची भीती.
- परीक्षा पुढे ढकली तर वर्ष वाया जाण्याची भीती
कोट
कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संचार बंदी केली आहे. परीक्षा देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर हजार तर दोन हजार जमा होणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणारचा आहे. आधीच परीक्षा पुढे ढकल्याने खूप वेळ गेला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे संयुक्तिक होणार नाही. तरी गंभीर परिस्थिती आहे. यावर विचार झाला पाहिजे.
-उमेश बचे, परीक्षार्थी
एमपीएससी ची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये कोरोना ची लक्षणे असताना देखील चाचणी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. चाचणी केल्यानंतर जर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आपल्याला देता येणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे.
- निलेश निंबाळकर, परीक्षार्थी
परिक्षा अवघ्या सात दिवसांवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावात आहेत. अभ्यास झालेला आहे. दोन विद्यार्थी कोरोनामुळे मृत्यू पावल्याने विद्यार्थी घाबरलले आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
- प्रवीण रणदिवे, अभ्यासिका चालक
चौकट
६५ टक्के विद्यार्थी म्हणतात परीक्षा पुढे ढकला
एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरणामुळे मृत्यू झाला. तसेच काही विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिलची परीक्षा झाली पाहिजे का नाही याबाबत वेगवेगळ्या २ टेलिग्राम ग्रुपमध्ये पोल घेतले असता ६५०० विद्यार्थ्यांपैकी ५०% विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी या बाजूने मत नोंदविले. तर तर दुस ग्रुपमध्ये ६५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी असे मत व्यक्त केले आहे. यामुळे आता परीक्षा होणार की नाही यामद्ये विद्यार्थी संभ्रमात आहेत.