पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ चा अंतिम निकाल बुधवारी (दि. ८) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम, तर सोलापूर जिल्ह्यातीलच आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत.
सदर परीक्षा दि. २७ ते २९ मे २०२५ राेजी घेण्यात आली हाेती. त्यातून विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. सदर निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा समावेश अंतिम निकालात केलेला नाही. दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास, इत्यादींसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे, अशी माहिती राजपत्रित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सं. पां. देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
Web Summary : MPSC declared the State Service (Main) Exam 2024 results. Vijay Lamkane topped overall, and Aarti Jadhav led among women. The exam occurred May 27-29, 2025, recommending 461 candidates across 20 categories. Results are on the MPSC website.
Web Summary : MPSC ने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2024 के परिणाम घोषित किए। विजय लामकाने ने सामान्य वर्ग में और आरती जाधव ने महिलाओं में शीर्ष स्थान प्राप्त किया। परीक्षा 27-29 मई 2025 को हुई, जिसमें 20 श्रेणियों में 461 उम्मीदवारों की सिफारिश की गई। परिणाम MPSC वेबसाइट पर हैं।