शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

MPSC: आयोगाने घातले परीक्षार्थींच्या बोलण्यावर निर्बंध; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:42 IST

परीक्षार्थी विविध समाजमाध्यमांवर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक आयोगाने काढले आहे

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc) आयोजित परीक्षा आणि निकालासंदर्भात समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाची आता नजर असणार आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आयोगाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी विविध सोशल मीडियावर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक काढले असल्याचे आयोगाने या परिपत्रकात नमूद केले आहे. तर आयोगाने हे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणल्याची भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया-

१. आदर कर्तुत्वातून कमवावा लागतो. तो असा धमकावून मिळत नाही. अशी हुकूमशाही भाषा वापरून विद्यार्थ्यांना धमकावणे बंद करावे. कोणाचे नुकसान करण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका.

२. आत्मपरीक्षण.  तुकाराम महाराज असे म्हणतात की "निंदकाचे घर असावे शेजारी"!

३. आयोगाला टीका सहन होत नाही आता. नवलच आहे बाबा

४. उमेदवारांच्या मनात चीड उत्पन्न करणारी कृती आयोगानेही करू नये. आपण घटनात्मक संस्था आहात आपण आपल्या दर्जानुसार काम करायला हवे. उत्तरतालिक जाहीर करता वेळी आयोगानेही पूर्ण अभ्यास करून जाहीर करावी व upsc कडून काही शिकावे

५. सन्माननीय आयोगाने विद्यार्थ्यांच्या उचित मागण्यांचा साकल्याने विचार करावा. मागील काही दिवसापासून आयोगामार्फत वारंवार सदोष प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन नंतर ती दुरुस्त का करावी लागतात याचादेखील आयोगाने विचार करावा. आयोगाच्या स्वायत्ततेची विद्यार्थ्यांना पूर्ण जाणीव आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा