पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल मंगळवारी (दि. ९) जाहीर झाला. यानुसार राज्यातील १ हजार ५१६ विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले आहेत. त्यातील सर्वाधिक १००४ विद्यार्थी पुणे केंद्रातील आहेत. त्या खालाेखाल छत्रपती संभाजीनगर येथील १४३, नाशिक येथील १११, नवी मुंबई १०८, नागपूर १०४ आणि सर्वात कमी ४६ विद्यार्थी अमरावती येथील आहेत.
यात कट ऑफ वाढला आहे. खुल्या गटाचा कट ऑफ ५०७ असून, एसईबीसी ४९०, ओबीसी ४८५, एनटी ४६३, ईडब्ल्यूएस आणि एससी ४४५, तर एसटीचा कट ऑफ ४१५ आहे. मागील काही वर्षांचा कट ऑफ पाहता ४९० पर्यंत हाेता.
यंदा हा कट ऑफ ५०० च्या पुढे गेला आहे. यावरून स्पर्धा परीक्षा देखील दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत असल्याचे दिसत आहे, असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले.