शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 07:20 IST

स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याच्या तणावातून स्वप्निल सुनील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. (MPSC examinee's suicide MPSC is magic, don't fall into it he said)स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्निलचे आईवडील हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

मराठा आरक्षण व कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातून येऊन प्रसंगी एक वेळ उपाशी राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे. विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत.

...त्याशिवाय सरकारला जाग येणार नाहीसरकारला माझा तळतळाट लागणार आहे. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही, असा हंबरडा फोडत स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनी दुःख व्यक्त केले. ''गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाही. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आमच्यावर जे संकट आले आहे… ते इतर कुणावर येऊ नये”, असे स्वप्नीलचे कुटुंबीय म्हणाले.

चुकीच्या धोरणाचा बळीशासनाने स्पर्धा परीक्षांबाबत घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच स्वप्निल या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला. त्यामुळे शासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रलंबित परीक्षा तत्काळ घ्याव्यात. तसेच राज्यसेवा व इतर परीक्षांमधून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली असून वेळेवर परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये,यासाठी एमपीएससीने यूपीएससी प्रमाणे नियोजन करून परीक्षा घ्याव्यात.     - संध्या सोनवणे, विद्यार्थिनी, स्पर्धा परीक्षा,२०१९ मध्ये जाहिरात आलेली गट ब ची परीक्षा ५ - ६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलांना आयोगाच्या कारभारामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.- राम लेंडेवाड, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा

समिती स्थापन होणारस्वप्निल लोणकर या तरूणाच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. परीक्षा झाल्यानंतर निवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विलंब कसा टाळता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार