शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

MPSC Exam: अभ्यास करताय ना? एमपीएससी २०२४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:45 IST

यासाेबतच गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा दि. १६ जून राेजी हाेणार आहे...

पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दि. २८ एप्रिल राेजी, तर मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात हाेईल. यासाेबतच गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा दि. १६ जून राेजी हाेणार आहे.

आयोगामार्फत प्रसिद्ध केलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा दि. १७ मार्चला हाेणार आहे. अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २६ ऑक्टाेबर, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा दि. १७ नाेव्हेंबर, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दि. ९ नाेव्हेंबर, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दि. १० नाेव्हेंबर, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दि. १० नाेव्हेंबर, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दि. २३ नाेव्हेंबर, निरीक्षक वैधमापक शास्त्र मुख्य परीक्षा दि. १ डिसेंबर, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दि. २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हाेईल, असे नमूद केले.

परीक्षांचे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे