शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

खासदार सुळेंच्याविरोधात ‘मिसेस कुल’? भाजपा-रासपाकडून संभाव्य नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 01:37 IST

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

यवत : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी करून मोठा शह पंतप्रधान नरेंद्र मोदी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वाची भूमिका निभावत असताना त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे ८० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या होत्या. सुळे यांचे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. सध्या जानकर राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पण जानकर यांनी मागील निवडणुकीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिजे तेवढा संपर्क ठेवलेला नाही. यामुळे त्यांच्याविषयी अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचमुळे भाजपा आता येथील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.बाहेरच्या उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवार सुळे यांच्याविरोधात देण्यासाठी भाजपा विचार करीत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची बारामती लोकसभेसाठी चर्चा आहे. सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी बारामती तालुक्याची लेक व दौंडच्या सूनबाई अशी दुहेरी ओळख असलेल्या ‘मिसेस कुल’ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर असून त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकदेखील आहेत.आमदार कुल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष सलगी आहे. त्यामुळेच भीमा पाटस कारखान्याला विशेष पॅकेज मिळाले आहे. आमदार संग्राम थोपटे आणि कुल यांची मैत्री सर्वश्रुत आहेच. खडकवासला मतदारसंघात भाजपाचे भीमराव तापकीर आमदार आहेत. भाजपा सेना युती झाल्यास राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे सहकार्य व इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्यावरील नाराजीचा फायदा कुल यांना मिळू शकतो. शिवाय कुल यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केल्याने त्यांना मानणारा वर्गही त्या पक्षात आहे.अर्थात, गेल्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यामुळे सध्या खासदार सुळे येत्या निवडणुकीसाठी जोरदारपणे कामाला लागल्या आहेत. गावदौऱ्यांच्या माध्यमातून गाव न् गाव पिंजून काढले आहे. गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात निवडणुकीलाअजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. भाजपा शिवसेनेत युती होते की नाही? पुढे कशा घडामोडी घडतात, यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा