शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्या विरोधात खासदार संजय काकडे न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 23:21 IST

10 जानेवारीला न्यायालयात सुनावणी; देओल कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे आदेश

पुणेः लोणावळ्यातील 185 एकर जमिनीचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. या जमिनीच्या वादातून भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. धर्मेंद्र, हेमा मालिनी, अभिनेता खासदार सनी देओल, अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री ईषा देओल, उषा अजितसिंग देओल, अहाना धर्मंद्र देओल, प्रकाश देओल, विजयसिंग देओल, अजितसिंग देओल यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धाव घेतली आहे. लोणावळा येथील 185 एकर जागेच्या संदर्भात धर्मेंद्र यांचे कुटुंबीय आणि काकडे यांच्यात व्यवहार झाला होता, त्याप्रमाणे दोघे मिळून सदर जागेवर जे. डब्ल्यू. मेरियट रिसॉर्ट व बंगल्याची स्कीम करणार होते. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना पैसे देऊनही जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार काकडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. काकडे म्हणाले, लोणावळामधील पुणे-मुंबर्इ द्रुतगती महामार्गाजवळील जागेबाबत 31 मे 2018 रोजी खासदार संजय काकडे आणि अभिनेता धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयांसोबत जागेचा व्यवहार निश्चित झाला. सदर ठिकाणी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची एकूण 215 एकर जागा आहे. त्यापैकी 25 एकर जागेत धर्मेंद्र यांचा बंगला आणि आजूबाजूचा परिसर आहे. उर्वरित 185 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर जे. डब्ल्यू. मेरियट हे आलिशान पंचतारांकित रिसॉर्ट उभारले जाण्याचे नियोजित आहे. यासाठी काकडे आणि धर्मेंद्र यांचे कुटुंबीय निम्मा-निम्मा खर्च करण्याचे ठरलेले आहे. त्यापैकी 30 टक्के उत्पन्न धर्मेंद्र कुटुंबीय तर 70 टक्के उत्पन्न काकडे घेणार असे ठरवण्यात आले. तर 85 एकर जागेवर संजय काकडे हे बंगल्यांची स्कीम बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दोघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार, असे निश्चित झाले. सदर व्यवहार दोघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपॉझिट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिली व त्यानंतर तातडीने जमिनीचे रजिस्ट्रेशन करून कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, धर्मेंद्र व त्यांचे मुलांनी चित्रपटाचे काम होऊ दे, निवडणूक होऊ दे असे सांगत 18 महिने होऊनही रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काकडे यांनी याबाबत धर्मेंद्र यांच्याकडे तसेच त्यांचे वकिलासोबत 20 वेळा बैठका घेऊनही पुढे काम जात नव्हते. काकडे यांनी सांगितले की, माझ्याकडून व्यवहार ठरल्यानंतर पैसे घेऊन ही पूर्ण जागा देण्यास नकार देत 85 एकर जागा घ्या आम्ही हॉटेलचे काम पाहतो असे सांगत टाळाटाळ केली गेली. माझ्यावर काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा ही प्रयत्न केला गेला, परंतु सदर व्यवहाराची कागदपत्रे पाहिल्यानंतर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी ही माझी बाजू योग्य असल्याचे सांगितले. धर्मेंद्र कुटुंबीयांना दुसरी एखादी मोठी पार्टी व्यवहारासाठी मिळाली असावी. त्यामुळे माझ्यासोबत व्यवहार करण्यास ते टाळाटाळ करत आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी आर. व्ही. रोटे न्यायालयात 10 जानेवारी रोजी होणार असून संबंधित केसला धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना हजर राहण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

टॅग्स :Sanjay Kakdeसंजय काकडेDharmendraधमेंद्रHema Maliniहेमा मालिनीSunny Deolसनी देओलBobby Deolबॉबी देओलIsha Deolइशा देओल