शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी जोपासली सिनेमाची चळवळ

By admin | Updated: July 6, 2015 04:15 IST

सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम चाकणचे तरुण करत आहेत.

चाकण : सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम, ‘भारत ज्ञान विज्ञान समुदायाचा ड्रामा फॉर सोशल चेंज,’ हा समूह गेली दोन वर्षे सातत्याने करत आहे .चाकण परिसर म्हटलं की गुंठामंत्री आणि आयत्या मिळालेल्या पैशांवर मजा करणारी पोरं डोळ्यांसमोर येतात. याच परिसरात काही तरुण अशा प्रकारचा उपक्रम सातत्याने राबवत आहेत ही गोष्ट मोठी आहे. हे तरुण खेड तालुकाभर ही चळवळ नेऊ इच्छितात. एरव्ही नोकरी करणे, व्यवसाय सांभाळणे, शिक्षण घेणे अशी सगळी कामे सांभाळून हे तरुण हे सगळं का करतात, हे विचारल्यावर त्यांचे उत्तर अवाक् करणारं होतं. .ते म्हणाले, ‘पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सर्व नाट्य आणि सिनेमा चळवळ केंद्रित झाली आहे. आमच्यासारख्या ग्रामीण मुलांना काही करायचं म्हटलं की रोज पुण्याला जाणं किंवा तिथं राहणं शक्य नाही. म्हणून या कलेचं विकेंद्रीकरण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व बाजूंनी प्रशिक्षित होऊन; कलेबाबत ज्ञान संपादित करत कला क्षेत्रात चाकण हे नाव मोठं करणं आणि कला ही फक्त पुण्या-मुंबईवाल्यांकडे नाही तर आम्हा ग्रामीण तरुणांकडेही आहे, हे सिद्ध करणं आमचं काम आहे.’ खेड तालुक्याचे काम दीपक मांडेकर,निखिल कांबळे, राहुल जाधव, नारायण करपे, नामदेव पडदुने, प्रमोद पारधी, संभाजी थिटे, वैभव धाडगे, सागर निखाडे,सागर राऊत, स्वप्नील निखाडे,केतन वाघमोडे,पांडुरंग पोटवडे, अक्षय घारे, अक्षय पानसरे,शेखर हळदे, कुणाल पालीवाल,गणेश गावडे, आमिर खान, स्वप्निल पाटील, सुदर्शन गायकवाड, केशव बनकर, विजय काकडे, सागर मांडेकर, नामदेव जरे, गिरीश कड, नमिता शेवकरी, माधुरी कुरकुटे, विजया तोडकर,प्रियांका चौधरी, स्नेहल गाडेकर, दीपाली शेवकरी हे तरुण पाहत आहेत.