शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 19:23 IST

एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देएमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन

लोणी काळभोर : एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन एमआयटी शिक्षण संस्थेचे मंगेश कराड यांनी दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एक जगविख्यात घुमट तयार करण्यात आला आहे.२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या घुमटाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत.मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सन्मान कृती समितीच्या माध्यमातून गेले काही दिवस हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतेक सर्व गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत होती. त्यानुसार आज महाराष्ट्र बॅकेपासून एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाच्या प्रारंभाच्या ठिकाणी येऊन मंगेश कराड यांनी मोर्चेकरी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा पुतळा बसवण्यात येईल. .............छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. वातावरणात एक अनामिक तणाव होता. परंतु, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आपला अनुभव पणाला लावून परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली. त्या बद्दल ते दोघे व संपूर्ण पोलीस प्रशासन कौतुकास पात्र आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmitएमआयटीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज