एसटी स्थानकासमोर आंदोलन
By Admin | Updated: September 3, 2014 00:32 IST2014-09-03T00:32:14+5:302014-09-03T00:32:14+5:30
एस.टी.महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी मंचर एस.टी.बसस्थानकावर युवा सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.

एसटी स्थानकासमोर आंदोलन
मंचर : एस.टी.महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी मंचर एस.टी.बसस्थानकावर युवा सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील विद्यार्थी व प्रवासी यांच्या एस.टी.फे:यांबाबत प्रलंबित मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात सुधारणा न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
अमोल दाभाडे, राहुल पोखरकर, काळुराम लोखंडे, मनोज ढेरंगे, विठ्ठल बांगर, युवा सेना महाविद्यालय युवा अधिकारी अमोल निघोट, निखील भोर, प्रतिक चिखले यांच्यासह विद्यार्थी व प्रवासी यावेळी हजर होते. मंचर वाहतुक नियंत्रक चिंतामण गोसावी यांना युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, काठापुर, देवगाव आणि पुर्व भागातील शेकडो विद्यार्थी दररोज पारगाव, अवसरी, निरगुडसर, मंचर येथे शाळा, महाविद्यालय शिकण्यासाठी येत असतात. ग्रामस्थ, प्रवाशांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असते. या भागातील विद्याथ्र्याची संख्या पहाता व वेळोवेळी निवेदन देऊनही एस.टी.प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी विद्याथ्र्यानी युवा सेनेचे पुणो जिल्हा चिटणिस सचिन बांगर यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेने या प्रश्नावर आवाज उठविला.
महाविद्यालय सकाळी 7.3क् वाजता व 11.3क् वाजता सुरू
होते. सकाळी 11.3क् वाजता दुपारी 4.45 वाजता महाविद्यालय
सुटते. सकाळी 9.3क् वाजता लाखणगाव ते मंचर एस.टी. सुरू करण्यात यावी व दुपारी 12
वाजता तसेच सायंकाळी 5 वाजता असणारी मंचर ते भीमाशंकर
कारखाना पारगाव गाडी लाखणगाव पर्यत विस्तारीत करण्यात यावी.
अशी मागणी या वेळी करण्यात
आली. (वार्ताहर)
4एस.टी.प्रशासनाने विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गुरूवार दि. 4 रोजी मंचर एस.टी.बसस्थानकाच्या आवारात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते अरूणभाऊ गिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा युवा सेनेचे पुणो जिल्हा चिटणिस सचिन बांगर यांनी दिला आहे.