कचरा प्रकल्पांविरोधात आंदोलन मागे
By Admin | Updated: November 28, 2014 00:53 IST2014-11-28T00:53:12+5:302014-11-28T00:53:12+5:30
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी दिल्यानंतर, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी येत्या 1 डिसेंबरपासून पुकारलेले आंदोलन आज मागे घेतले.

कचरा प्रकल्पांविरोधात आंदोलन मागे
पुणो : फुरसुंगी येथे 12 इंची पाइपलाइन आणि 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 1 डिसेंबर्पयत सुरू करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी दिल्यानंतर, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी येत्या 1 डिसेंबरपासून पुकारलेले आंदोलन आज मागे घेतले.
चार महिन्यांपूर्वी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत दिलेली लेखी आश्वासने महापालिकेने पाळली नसल्याचे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार विजय शिवतारे यांच्या निदर्शनास आणून देत, बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी तातडीने या ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर आंदोलन 31 डिसेंबर्पयत पुढे ढकलण्यात आल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी फुरसुंगी येथे 12 इंची पाइपलाइन आणि सुमारे 2 वर्षापूर्वी उभारलेला 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 48 तासांत कार्यान्वित करणो यासह पाणी योजनेसाठी पालिकेने तत्काळ आपला 16 कोटींचा हिस्सा भरणो, कचरा डेपो बाधितांच्या 64 नातेवाइकांना तत्काळ महापालिका सेवेत घेणो, अशी आश्वासने देण्यात आली होती. यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा करीत ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ही आश्वासने 3क् नोव्हेंबरला पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी दिलेली मुदत 1 महिना शिल्लक असली तरी, 1 डिसेंबरपासूनच गाडय़ा अडविण्यात येणार असल्याचा इशारा दिला.
त्यानंतर गुरुवारी सकाळी याबाबत आयुक्त कुमार यांनी आमदार शिवतारे यांच्यासह ग्रामस्थांची बैठक घेतली, तसेच पाइपलाइन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प 1 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित आश्वासने 31 डिसेंबर्पयत पूृर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे शिवतारे म्हणाले.
महापौर घेणार आज बैठक
दरम्यान, उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित आश्वासनांबाबत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही उद्या (शुक्रवारी) महापालिकेत बैठक बोलाविली आहे. या वेळी ग्रामस्थांची बाजू जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि पालिकेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.