अपंग कायद्यासाठी पालिकेसमोर आंदोलन

By Admin | Updated: April 14, 2017 04:29 IST2017-04-14T04:29:30+5:302017-04-14T04:29:30+5:30

कायद्यानुसार महापालिकेने उभारलेल्या गाळेवाटपात अपंग व्यक्तींना चार टक्के आरक्षण मिळावे, नोकरभरतीचा अनुशेष भरावा या मागण्यांसाठी दिव्यांग संघाच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

Movement against the corporation for the disabled | अपंग कायद्यासाठी पालिकेसमोर आंदोलन

अपंग कायद्यासाठी पालिकेसमोर आंदोलन

पुणे : कायद्यानुसार महापालिकेने उभारलेल्या गाळेवाटपात अपंग व्यक्तींना चार टक्के आरक्षण मिळावे, नोकरभरतीचा अनुशेष भरावा या मागण्यांसाठी दिव्यांग संघाच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
महापालिकेअंतर्गत प्रलंबित अपंगकल्याणकारी योजनांची अंमलबाजवणी व्हावी, नोकरीतील अनुशेष तत्काळ भरावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दादा आल्हाट, धर्मेंद्र सातव, सुनील शिंदे, दत्ता मिरगणे, सुप्रिया लोखंडे, पल्लवी खुराणा, अनिता कांबळे, बापू कोकरे
हे या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Movement against the corporation for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.