शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्हाभर आंदोलन; ऊसाला ३ हजार दरासाठी रयत क्रांतीचा इंदापुरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 18:59 IST

सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला.

ठळक मुद्देरयत क्रांती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोतीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र : रयत क्रांती

इंदापूर : शासनाने एफआरपी वाढवल्यानंतर साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरायला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांसाठी नुकसानदायक असणारा हा प्रकार बंद करावा, सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला.पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने करण्याच्या रयत क्रांती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले. ते म्हणाले, की गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र शासनाने जशी जशी एफआरपीची रक्कम वाढवली. तशी तशी साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरण्यास सुरुवात केली आहे. खरा साखर उतारा दडवला जात आहे. परिणामी एफआरपीची रक्कम कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आज सरासरी २४०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. तो ऊस उत्पादक व रयत क्रांती संघटनेस मान्य नाही. तीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, होणाऱ्या दुष्परिणामांना साखर कारखानदार जबाबदार असतील, असे देवकर म्हणाले.या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर, जिल्हा संपर्कप्रमुख सर्फराज शेख, तालुकाध्यक्ष अभिमान शिंदे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान देवकर यांची भाषणे झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे