शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

मेफेड्रोन बनविण्यासाठी गुजरातला हलविले बस्तान; ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 20:40 IST

अमली पदार्थांसाठी सुरू करणार होते कंपनी

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सापळा लावून केली होती आरोपींना अटक

पिंपरी : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज या अमली पदार्थांच्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड होत असतानाच त्याचे धागेदोरे बाॅलीवुड तसेच बड्या धेंडांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी रांजणगाव येथील कंपनीत छापा टाकल्यानंतर आरोपींनी गुजरातला बस्तान हलविले. मेफेड्रोन तयार करण्यातसाठी गुजरात येथे आरोपी कंपनी सुरू करणार होते. 

पिंपरी-चिंचवडपोलिसांनी मेफेड्रोन प्रकरणात मोठी कारवाई करून २० आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपी यांनी रांजणगाव येथील बंद कंपनीत १३२ किलो मेफेड्रोन बनविले. त्यातील ११२ किलो ड्रग्ज तुषार काळे याने नायजेरियन आरोपी झुबी उडोको याला विक्री केले. राहिलेले २० किलो ड्रग्ज अक्षय काळे विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सापळा लावून आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये झुबी इफनेयी उडोको या नायजेरियनचा समावेश आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे.   अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याशी संबंधित अमली पदार्थांच्या एका प्रकरणात राकेश खानिवडेकर हा साक्षीदार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईत मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. ड्रग्ज बनविण्यासाठी तुषार काळे व राकेश याने महाड एमआयडीसीतील एक कंपनी तसेच कर्जत डोंगरगाव येथील एका फार्म हाऊसमध्ये  प्रशिक्षण घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक गिरीष चामले, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनील कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदीप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठ्ठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDrugsअमली पदार्थGujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक