दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या
By Admin | Updated: January 14, 2017 03:17 IST2017-01-14T03:17:49+5:302017-01-14T03:17:49+5:30
निगडाळे (गोठेची वाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे आईने दोन चिमुकल्यांसह विष पिऊन आत्महत्या केली. आंबेगाव

दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या
तळेघर : निगडाळे (गोठेची वाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे आईने दोन चिमुकल्यांसह विष पिऊन आत्महत्या केली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे (गोठेवाडी) येथे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये आशा ज्ञानेश्वर गवारी (वय २५) हिने मुलगा सार्थक ज्ञानेश्वर गवारी (वय अडीच वर्षे) व मुलगी आर्या ज्ञानेश्वर गवारी (वय ७ महिने) यांच्यासह आपल्या राहत्या घरी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेचे पती ज्ञानेश्वर गोविंद गवारी यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, आशा हिला पोटदुखीच्या आजाराने मागील काही महिन्यांपासून त्रास होत होता. याच नैराश्यातून प्रथम दोन्ही मुलांना विष देऊन नंतर विष घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले.