श्रवणानिमित्त सखींसाठी माहेरचा आहेर
By Admin | Updated: August 6, 2014 00:17 IST2014-08-06T00:17:28+5:302014-08-06T00:17:28+5:30
पावसाची भुरभुर, हिरवीगार झाडे, प्रफुल्लित वातावरण, सणांचे उधाण हा सगळा योग श्रवणातच जुळून येतो.

श्रवणानिमित्त सखींसाठी माहेरचा आहेर
पुणो : पावसाची भुरभुर, हिरवीगार झाडे, प्रफुल्लित वातावरण, सणांचे उधाण हा सगळा योग श्रवणातच जुळून येतो. श्रवण आला की नागपंचमी, कृष्णजन्माष्टमी, मंगळागौर आणि त्यासोबतच अनेक सण-उपवास आलेच! सखी मंच या अशाच मंगलप्रसंगी आपल्या सखींना आनंद वाटण्याच्या कामात एक मोलाची भर घालत असते. अगदी याच योगाचे निमित्त ठेवून सखी मंचाने ‘श्रवणोत्सव’ आयोजित केला आहे.
सखी मंच व यूएसके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘श्रवणोत्सव’ हा कार्यक्रम 8
ऑगस्ट रोजी अमित गायकवाड
यांचे कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे
पूल, एरंडवणो येथे होणार आहे.
हा कार्यक्रम चंदुकाका सराफ
अँड सन्स प्रा. लि. आणि केप्र मसाले यांच्या सहयोगाने आयोजित केला आहे.
श्रवणाच्या निमित्ताने सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. प्रत्येक स्पर्धेचे वेगळे असे वैशिष्टय़
आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर आपण रंग, फुलं, मीठ यांपासून काढलेल्या रांगोळ्या पाहिल्या आहेत. परंतु, या स्पर्धेमध्ये रांगोळी धान्यापासून काढण्यात येणार आहे.
श्रवणातील उपवासांचे औचित्य साधून पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाककृतीसाठी सखींनी उपवासाचे पदार्थ घरूनच बनवून आणायचे आहेत. येताना आपल्या पदार्थासोबत त्याची पाककृतीही लिहून आणणो आवश्यक असेल. श्रवणातली मंगळागौर हा सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठीच सखी मंचाने पारंपरिक श्रवण खेळांचे आयोजनही केले आहे. अशा या धुंदमधुर वातावरणात एक वेगळीच रंगत टाकण्यासाठी चिंब भिजलेले या सप्तसुरात न्हाऊन निघणा:या अनोख्या स्वराविष्काराचेही आयोजन करण्यात आले आहे. सई टेंभेकर, केतन गोडबोले, संदीप उबाळे, मानसी परांजपे यांच्या सदाबहार गाण्यांचा आनंद लुटता येणार आहे. या वेळी सखींना खरेदीचा आनंदही लुटता यावा याकरिता सखी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सखींना आगळा वेगळा फॅशन शोदेखील अनुभवता येणार आहे.
या फॅशनशोसाठी प्रसिद्ध फॅशन डायरेक्टर आणि कोरिओग्राफर संदीप धर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. मेकअप आणि केशरचनेसाठी शिल्पा पाटील व टीम असणार आहे. श्रवणोत्सव या कार्यक्रमासाठीचे रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी असून, बेव्हरेज पार्टनर सुमेरू बेव्हरेजेस आहेत.
4एरंडवणो : लोकमत भवन, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणो, पुणो. फो. क्2क्-6684 8586 4हडपसर : लोकमत मीडिया प्रा. लि., मेगासेंटर, शॉप नं. के-114, तळमजला, हडपसर,पुणो-28. फो. क्2क्-2689क्2क्6 4रविवार पेठ : चंदुकाका सराफ सन्स अँड प्रा. लि., रविवार पेठ, फडके हौद, पुणो फो. क्2क्-2443 1241/42 4वारजे माळवाडी : संजीवनी उन्हाळे फो. 9762476429 4कोथरूड : प्राजक्ता अॅडव्हर्टायजिंग फो. क्2क्-2545 628क्, 9764क्क्9836
4बिबवेवाडी : अरुणा गटागट फो. फो. 94क्3278459
4कात्रज : वृषाली वजरीनकर फो. 897589क्567 4सिंहगड रस्ता : कल्याणी एम्ब्रॉयडरीज फो. क्2क्-2434 9894 4पेठ : विद्या मेठी फो. 9326356557, निकीता गुप्ता फो. 986क्517755
4येरवडा : संगीता राजगुरू फो.
9823427345 4वडगाव शेरी : पौर्णिमा लुणावत फो. 9372क्क्1333 4धनकवडी : चेतना बिडवे फो. 8624969क्8क्
गप्पा टप्पा
4या श्रवणोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सखी सभासदांना ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील आपली लाडकी अभेनेत्री प्राजक्ता माळी हिच्याशी मनसोक्त गप्पा मारता येणार आहेत.
आरजेसोबत करा धमाल
4रेडिअो सिटीच्या आरजे अपूर्वासोबत खास धमाल मस्ती आणि वैविध्यपूर्ण खेळ सखी सभासदांना खेळता येणार आहेत.
पाककृती कार्यशाळा
4सखींना झटपट रेसिपीज या पाककृती कार्यशाळेत पुण्याच्या प्रसिद्ध शेफ ‘शोभा इंद्राणी’ यांच्याकडून वेगळे-वेगळे पदार्थ शिकायला मिळणार आहेत.