शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील चिखलगाव येथे दोन लहान मुलींसह आईची विहिरीत उडी मारुन आत्मह्त्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:12 IST

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

ठळक मुद्देहत्या की आत्महत्या याचा करत आहेत पोलिस तपास

राजगुरुनगर : चिखलगाव येथे (ता. खेड ) दोन लहान मुलीसह आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत हत्या की आत्महत्या यांचा तपास पोलिस करत आहेत.सुरेखा उत्तम गोपाळे (वय३२ ) व तुप्ती उत्तम गोपाळे (वय ६ ) ज्ञानश्री उत्तम गोपाळे (वय ३ ) (रा. चिखलगाव ता खेड ) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचा पती उत्तम रघुनाभ गोपाळे (वय३८ रा. चिखलगाव, ता. खेड )याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरेखाचा भाऊ रामचंद्र काशिनाथ मोरे (रा. देवोशी ता. खेड ). यांने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तम गोपाळे यांची पत्नी सुरेखा आपल्या दोन मुलींसह उन्हाळी बाजरीच्या शेतात पाणी देण्यास गेली होती. तसेच नवरा कृषी पंप चालू करण्यास गेला होता. दरम्यान सुरेखा व दोन लहाण मुलीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसुन आले.. तात्काळ ही माहिती खेड पोलिस स्टेशनला कळवून पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने तिन्हीही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. ते शवविच्छेदनासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहे. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू