मावस बहिणीने बहिणीला इस्त्री फेकूण मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST2021-02-07T04:11:30+5:302021-02-07T04:11:30+5:30

सुरेखा दत्तात्रय गाडगे ( रा.पिंपळे गुरव पुणे , कमल किसन घोडेकर ( रा.सायगाव ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या ...

The mother-in-law threw the iron at her sister | मावस बहिणीने बहिणीला इस्त्री फेकूण मारले

मावस बहिणीने बहिणीला इस्त्री फेकूण मारले

सुरेखा दत्तात्रय गाडगे ( रा.पिंपळे गुरव पुणे , कमल किसन घोडेकर ( रा.सायगाव ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिता रमेश बढेकर यांना त्यांची मावस बहिण सुरेखा हिने पैसे उसणे दिले होते. ते परत मागण्यासाी सुरेखा व अनिताच्या मावशी कमल घोडेकर दोघी अनिताच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी सुरेखा हिने दिलेले पैसे परत मागितले, तेंव्हा आता माझ्याकडे पैसे नाही, दोन-तीन दिवसात पैसे देईल असे अनिताने सांगितले. त्यामुळे सुरेखा व तिची आई कमल यांनी अनिताल शिवीगाळ करत मारहाण केली घरातील इस्त्री फेकून जखमी केले. पैसे नाही दिल्यास बघून घेऊ असा दम दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. राजेंद्र हिले करत आहे.

Web Title: The mother-in-law threw the iron at her sister