मुगला न झाल्याने आईनेच केला मुलीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:01+5:302020-12-02T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगवी : माळेगाव येथे सव्वा महिन्याच्या मुलीचा खून करून तीचा मृतदेह पाण्याच्या टाकलेल्या घटनेला नवी कलाटणी ...

मुगला न झाल्याने आईनेच केला मुलीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : माळेगाव येथे सव्वा महिन्याच्या मुलीचा खून करून तीचा मृतदेह पाण्याच्या टाकलेल्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. तिसऱ्यांदा मुलगा न होता मुलगी झाल्याने आपल्या पोटच्या गोळाला आईनेच मुलाच्या हव्यासापोटी संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी रविवारी (दि २९) आईला अटक केली, अशी माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.
दिपाली संदीप झगडे (रा. काटेवाडी) असे आरोपी आईचे नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे बुधवारी (दि २५) घडली होती. काटेवाडी (ता. बारामती) येथील दिपाली झगडे ही तिसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी माळेगाव येथे वडिल संदीप जाधव यांच्या घरी आली होती. तिला दोन मुली आहेत. तिला मुलगा हवा होता. मात्र, तिसऱ्यांदा तिला मुलगीच झाल्याने ती नैराश्यात होती. बुधवारी तीने तीच्या सव्वा महिन्याच्या मुलीला पाळण्यात झोपवले. व तिही झोपी गेली. दिपाली झोपेतून उठल्यावर चिमुकली पाळण्यात नव्हती. तिचा शोधाशाेध घरच्यांनी घेतला. ती न सापडल्याने तिच्या आजोबाने ती हरवल्याची तक्रार माळेगाव दुरक्षेत्रात दिली. त्यानंतर मुलीचा मृतदेह घराजवळील पाण्याच्या टाकीत आढळला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घरच्या सर्वांची सखोल चौकशी केली. आई दिपालीचीही कसून चौकशी करण्यात आली. मात्र, तीच्या जबाबात तफावत आढळली. पोलिसांनी आणखी कठोर चौकशी केली. यात तिनेच मुलीचा खून केल्याची कबुली दिली. आधी दोन मात्र, तिसऱ्यांदाही मुलगी झाल्याने तीने आपल्या पोटच्या गोळाला मारून पाण्याच्या टाकीत टाकल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपी आईला रविवारी अटक केली. पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते करत आहेत.