आईला मिळाला न्याय
By Admin | Updated: November 14, 2016 03:09 IST2016-11-14T03:09:03+5:302016-11-14T03:09:03+5:30
आपल्या २१ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी तिचे अवयव दान करणाऱ्या आई

आईला मिळाला न्याय
पुणे : आपल्या २१ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी तिचे अवयव दान करणाऱ्या आई आणि कुटुंबातील कर्त्या महिलेला लोकन्यायालयात न्याय मिळाला. या महिलेला विमा कंपनीशी झालेल्या तडजोडीमुळे १० लाख रुपये मिळाले. सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी, अॅड़ सुभाष किवडे आणि अॅड. व्ही. यू. काळे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
शनिवारी झालेल्या महालोक अदालतीमध्ये तडजोडीअंती १० लाख रुपये देत हा दावा निकाली काढण्यात आला.
दि न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीतर्फे अधिकारी सगरी, अॅड. सी. डी. अय्यर, अॅड. व्ही. यू. काळे यांनी तडजोडीसाठी यशस्वी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
बसच्या धडकेत झाला होता मृत्यू-
४पायल रमेशलाल कुकरेजा (वय २१, रा. पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. पायल हिच्या वडिलांचे याअगोदरच निधन झाले आहे़ त्यामुळे पायल, आई भावना (वय ६५) आणि तिची २३ वर्षीय बहीण असे तिघींचे कुटुंब होते. पायल सी. ए. चा अभ्यास करत होती.
४पायल २६ आॅक्टोबर २०१४ रोजी दुचाकीवरून क्लासला जात होती़ त्या वेळी पिंपळे सौदागर येथे बसने तिच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर तीन रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला़ हे दु:ख बाजूला ठेवून तिच्या आईने पायलचे डोळे, किडनी, त्वचा असे अवयव दान केले़ त्यानंतर त्यांनी अॅड. कांचन धामणकर यांच्यामार्फत दि न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात २७ मार्च २०१५ रोजी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.