शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आईला घराबाहेर काढणा-या मुलासह सुनेला न्यायालयाचा दणका :दरमहा १० हजार पोटगी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:57 IST

याचिकाकर्त्या ७४ वर्षीय वृध्द आईस दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवृध्द मातेस पोटगी देण्याचे आदेश, खर्चासाठी दरमहा १० हजार मिळणारआईला घराबाहेर काढणा-या मुलासह सुनेला न्यायालयाचा दणका 

पुणे : सिलेंडरचे बटण सुरू ठेवून आईला जीवे मारण्याचा प्रयत्न, सदनिका बळकाविण्यासाठी शिवीगाळ करून तिला शारीरिक व मानसिक छळ करणा-या आणि जेवायला न देता जन्मदात्या आईला घराबाहेर काढणा-या व्यावसायीक मुलाला आणि सुनेला न्यायालयाला दणका दिला आहे.

         याचिकाकर्त्या ७४ वर्षीय वृध्द आईस दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. तसेच मुलाने व सुनेने इतरामार्फ त तसेच स्वत: वृध्द आईला त्रास न देण्याचे आदेश दिले असून त्या राहत असलेल्या घरात  जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत वृध्द महिलेने अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. हेमंत भांड आणि अ‍ॅड. अभिजीत बिराजदार यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरूध्द न्यायालयात धाव घेतली होती. लालमहाज जवळ राहत असलेल्या एका कुटुंबात गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तक्रारदार महिलेस दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी आहे. वृध्द महिलेनी स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. तक्रारदार आणि त्यांचे पती घराजवळच भेळीचा व्यावसाय करीत. पतीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा, त्याची पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने तक्रारदार यांच्या घरात राहत होती. त्रास देणा-या मुलाचे बुधवार पेठेत दोन कापडाची दुकाने आहे. त्याची पत्नी त्याला व्यवसायत मदत करते. 

           तक्रारदार यांना जेवायला न देणे, गॅस सिलेंडरचे बटन सुरू ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार त्यांच्या सुनेकडून सुरू होते. तर सदनिका बळकाविण्यासाठी मुलाकडून सतत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्रास देणे सुरू होते. मुलाच्या आणि सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणाच दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहे. त्यानंतरही मुलाचा आणि सुनेचा जाच सुरूच होता. त्यामुळे दोघांच्याही त्रासाला कंटाळून वृध्द आईने महिलांचा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत दैनदिन गरजांसाठी पोटगीची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अ‍ॅड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तीवादनंतर वृध्द आईला मुलाने १० हजार पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच मुलाला आणि सुनेला वृध्द आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे. 

मुलाने याआधी एक फ्लॅटही विकला

तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीने कात्रज येथे एक प्लॅट घेतला होता. लोन करण्यासाठी तो प्लॅट मुलाने नावाकरून घेतला. त्यानंतरही त्याचा त्रास सुरू असल्याने त्याने कात्रजला रहायला जावे, असे तक्रारदार यांनी त्याला सांगितले. मात्र त्याने परस्पर तो फ्लॅट विकून टाकून तक्रारदार यांच्यांत घरात राहू लागला, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMothers Dayजागतिक मातृदिन