आईनेच दिले चिमुरडीला चटके! मातृत्वाला काळिमा; मसाल्यामध्ये पाणी सांडल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 02:51 AM2017-11-12T02:51:49+5:302017-11-12T02:51:59+5:30

मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mother gave chimera chats! Maternal stigma; Due to the spill of water in spices | आईनेच दिले चिमुरडीला चटके! मातृत्वाला काळिमा; मसाल्यामध्ये पाणी सांडल्याचे कारण

आईनेच दिले चिमुरडीला चटके! मातृत्वाला काळिमा; मसाल्यामध्ये पाणी सांडल्याचे कारण

googlenewsNext

पुणे : मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. हडपसर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
सोनी संतोष शेट्टी ( रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांच्या शेजारी राहणाºया रजनीश तिवारी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळेनगरमध्ये राहाणारे शेट्टी कुटुंब रोजंदारी करते. शेजारी राहणाºयांकडे चिमुरडी सातत्याने यायची-जायची. शुक्रवारी ती आली असता तिवारींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. विचारपूस केल्यानंतर केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्यावरून तिला चटके दिल्याचे त्यांना समजले. शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे.

आ.नीलम गोºहे यांच्याकडून विचारपूस
शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी शनिवारी संध्याकाळी बालिकेची विचारपूस केली. अत्याचाराची घटना व तपासाबाबत हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली.

Web Title: Mother gave chimera chats! Maternal stigma; Due to the spill of water in spices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा