शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उच्च दाबाची विजेची तार बुलेटवर पडल्याने आई व मुलगा भाजून जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:27 IST

बुलेटवरून जात असताना विजेची तार पडून तिघा जणांना अपघात घडला. यात एक जण गंभीर भाजला आहे.

ठळक मुद्देमुलाची प्रकृती चिंताजनक, रोहकल येथील घटना....देवासारखा धावून आला देवा अन वाचवले माय लेकाचे प्राण....उच्च दाबाची विजेची तार अचानक तुटून बुलेटवर पडून तीन जण गंभीर भाजले

चाकण : वेळ दुपारी तीनची...विशाल आपल्या आईसह बुलेटवरून शेताकडे जात होता... शेतात पिकाला पाणी द्यायला जात असताना अचानक उच्च वाहिनी विजेची तार तुटली... ती अचानक बुलेटवर पडली....यावेळी त्यांचा क्रेनवरील वरील ड्रायव्हर परमेश्वर उर्फ देवा हा देवासारखा धावून आला... अन आपल्या मालकाच्या दुचाकीवर पडलेली तार धोका पत्करून हाताला स्कार्फ गुंडाळून अक्षरश: हाताने बाजूला फेकली...अन मालकाचे प्राण वाचविले....तरीसुध्दा विशाल या अपघातात गंभीर भाजला... ही घटना रोहकल ( ता.खेड ) येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी( दि. १९ ) दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत विशाल दशरथ काचोळे ( वय २६, रा. रोहकल, ता.खेड, जि.पुणे ) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यात विशालची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याचे वडील माजी सरपंच दशरथ काचोळे यांनी सांगितले. विशालची आई विमल दशरथ काचोळे ( वय ४२, रा. रोहकल ) व परमेश्वर लक्ष्मण हराळे ( वय २८, रा. रोहकल, मुळगाव राजपिंपळे, ता.गेवराई, जि.बीड ) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी परमेश्वर हराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उच्च दाबाची विजेची तार अचानक तुटून बुलेटवर पडून तीन जण गंभीर भाजले आहे. त्यामध्ये एक जण गंभीर व दोन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार एस. आर. हरगुडे यांनी दिली. घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली असून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा खंडित करून विजेची तार जोडण्याचे काम सुरु केले आहे. ==================================

टॅग्स :KhedखेडmahavitaranमहावितरणPoliceपोलिसAccidentअपघात