शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील अपघातात चिमुकलीसह आई-आजीचा होरपळून मृत्यू

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 1, 2023 18:03 IST

या घटनेमुळे वनकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...

पिंपरी : Buldhana Bus Accident- समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपळे सौदागर येथील वनकर कुटुंब उद्धवस्त झाले आहे. येथील परिणीत वनकर यांची आई शोभा वनकर (वय ६६) पत्नी वृषाली वनकर(वय ३८), व मुलगी ओवी वनकर (वय ०२) या तिघींचाही समृद्धी महामार्गावरील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आली. या घटनेमुळे वनकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जरवरी सोसायटीत शोककळा पसरली होती.

वनकर कुटुंबिय ८ जूनला नातेवाईकांच्या भेटीसाठी गावी गेले होते. त्यांचे मुळगाव हे चंद्रपूर हे होते. परिणीत हे कामामुळे लगेच परतले होते. शुक्रवारी (दि.३०जून)या वर्ध्याहून आपल्या मुलीला भेटून परत निघाल्या होत्या. तसेच त्याच गाडीत वृषाली व ओवी या यवतमाळहून वृषाली यांच्या बहिणीला भेटून परत निघाल्या होत्या. रात्री जेवन झाल्यानंतर परिणीत आणि वृषाली यांचा फोन झाला होता. सकाळी चारच्या सुमारास बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिणीत वनकर हे बुलढाण्याला गेले.

मे महिन्यांतच झाला होता वाढदिवस...

ओवीचा दुसरा वाढदिवस ११ मेला सर्व कुटुंबियांनी जल्लोषात साजरा केला होता. शोभा वनकर व त्यांची सुन वृषाली यांचा स्वभाव हा मनमिळावू होता. तसेच त्या सर्वांची आस्थेने विचारपूसही करत असत असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. शोभा वनकर यांच्या पतीचे कोरोनात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात ओवीच्या आगमनाने आनंद पसरला होता. दोन दिवसांपूर्वीच परत येत आहोत. कामवाल्या बाईकडून घराची साफसफाई करून घ्या, असे शोभा वनकर यांचे शेजारी राहणाऱ्या बिरारी कुटुंबाशी बोलणे झाले होते.

धार्मिक कुटुंब...

वनकर कुटुंबीय धार्मिक होते. शोभा वनकर या सोसायटीतील मंदिराची पुजा-अर्चा नेहमी करत असत. तसेच त्या भजनी मंडळाच्या सभासदही होत्या. सोसायटीच्या उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घ्यायच्या. असे जरवरी सोसायटीचे चेअरमन रविंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातbuldhanaबुलडाणा