पाणी भरण्याच्या कारणावरून आई-मुलाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:06+5:302020-12-02T04:05:06+5:30
मंचर: शेतात पाणी भरण्याच्या कारणावरून कुरवंडी (ता.आंबेगाव) येथे आई-मुलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संजय गणपत तोत्रे व दत्तात्रय ...

पाणी भरण्याच्या कारणावरून आई-मुलाला मारहाण
मंचर: शेतात पाणी भरण्याच्या कारणावरून कुरवंडी (ता.आंबेगाव) येथे आई-मुलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संजय गणपत तोत्रे व दत्तात्रय बबन तोत्रे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी कविता विठ्ठल तोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कविता तोत्रे व त्यांचा मुलगा आकाश हे त्यांच्या घराजवळी शेतामध्ये पिकांसाठी पाणी भरत होते. त्यावेळी पुतण्या संजय गणपत तोत्रे याने मध्येच जाऊन पाण्याची मोटर बंद केली. त्यावेळी कविता तोत्रे व आकाश हे विहिरीजवळ जाऊन मोटर का बंद केली अशी विचारणा केली. त्यावेळी संजय तोत्रे हा आम्हाला आता पाणी भरायचे आहे तुम्ही भरू नका असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादी यांनी आमचे पाणी भरणे चालू आहे, असे म्हटल्याने त्याने तोत्रे यांला शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच कविता तोत्रे मारहाण करण्यास सुरुवात केली. चुलत दीर दत्तात्रय बबन तोत्रे हा तेथे आला. त्यांनेदेखील शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. आकाश तोत्रे मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दोघे निघून गेले. पोलिसांनी संजय गणपत तोत्रे व दत्तात्रय बबन तोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.