शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

पुणे शहरातील कोरोनाबाधित मृत्यूपैकी सर्वाधिक ससून रुग्णालयामध्येच ; त्यामागचं ' हे 'आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:25 IST

ससून रुग्णालयाविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच कोरोना बाधित व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्येही भीती निर्माण होऊ लागली आहे.

ठळक मुद्देससूनमध्ये सध्या सुमारे २५ रुग्ण दाखल असून त्यापैकी जवळपास १० रुग्ण गंभीर

पुणे : शहरातील कोरोनाबाधित मृत्यूपैकी ससून रुग्णालयामध्येच सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे ससूनविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे. पण ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण खासगी रुग्णालयातून तर काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आलेले आहेत. त्यांची प्रकृती आधीच खुप खालावलेली होती. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अन्य आजार होते. त्यामुळे ससूनमधील मृतांचा आकडा अधिक दिसत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.       

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरूवारी दुपारपर्यंत मृत्यूची संख्या  २० वर पोहचली असून त्यापैकी ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्या १० हून अधिक आहे. तर उर्वरित रुग्णांचा नायडू किंवा अन्य खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच कोरोना बाधित व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्येही भीती निर्माण होऊ लागली आहे. ससूनमध्ये सध्या सुमारे २५ रुग्ण दाखल असून त्यापैकी जवळपास १० रुग्ण गंभीर आहेत. दररोज रुग्णसंख्या वाढत चालली आहे.

यापार्श्वभुमीवर बोलताना डॉ. चंदनवाले म्हणाले, ससूनमध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचे वय ६० च्या पुढे आहे. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच अन्य जुनाट आजारही होते. या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयांकडून गंभीर अवस्थेत ससूनकडे पाठविले जात आहेत. तसेच काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यावेळी काहींची प्रकृती खालावलेली असते.

ससूनमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. रुग्णांची लक्षणे पाहून तसेच आधीच्या आजाराप्रमाणे औषधे दिली जात आहेत. त्यात बदलही केले जात आहेत. गंभीर रुग्णांमध्ये अन्य आजार असो वा नसो त्यांचे हृदय, फुफ्फुस, मुत्रपिंड, यकृत आदी अवयवांची तपासणीही केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा इतर अवयवांवर काय परिणाम होत आहे हेही तपासले जात आहे. ससूनमध्ये योग्यप्रकारे काळजी घेतली जात असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. मृतांमध्ये वयोवृध्द व आधी आजार असलेल्या नागरिकांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी स्पष्ट केले.----------------पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचाही दुजोराससूनमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण जास्त असले तरी त्यास ससून जबाबदार नसल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ससूनमध्ये दाखल होणारे रुग्ण गंभीर स्थितीतील असतात. खासगी रुग्णालये हे रुग्ण त्यांच्याकडे पाठवितात. त्यामुळे तेथील मृतांचा आकडा जास्त आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.-----------

--

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या