बहुतेक विजयी उमेदवार उच्चशिक्षित
By Admin | Updated: October 19, 2014 23:00 IST2014-10-19T23:00:43+5:302014-10-19T23:00:43+5:30
महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुणे जिल्ह्यातून निवडून गेलेले बहुतेक विजयी उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यात इंजिनिअर, वकील, प्राध्यापक अशा उमेदवारांचा समावेश आहे

बहुतेक विजयी उमेदवार उच्चशिक्षित
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुणे जिल्ह्यातून निवडून गेलेले बहुतेक विजयी उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यात इंजिनिअर, वकील, प्राध्यापक अशा उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या मतदारसंघातील शिक्षित उमेदवाराला निवडून दिल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. भाजपच्या विजयी उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी बी.एस्सी.एम.एड. केले आहे. शिवसेनेचे विजय शिवतरे इंजिनिअर असून, राहुल कुल बी.ए., एल.एल.बी. आहेत. जगदीश मुळीक, संग्राम थोपटे यांनी बी.ए. तर योगेश टिळेकर यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
त्याचप्रमाणे माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणे यांनी बी.कॉम केले असून, सुरेश गोरे यांनी बी.कॉम, डीटीएल, डीडीएम तर बाबूराव पाचर्णे यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून, भाजपचे ज्येष्ठ विजयी उमेदवार गिरीश बापट यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. भीमराव तापकीर यांनीसुद्धा दहावीपर्यंत शिक्षण
घेतले आहे. (प्रतिनिधी)