सहकारनगर, टिळक रस्ता, येरवड्यात सर्वाधिक फैलाव

By Admin | Updated: March 5, 2015 00:28 IST2015-03-05T00:28:53+5:302015-03-05T00:28:53+5:30

पुण्याला स्वाइन फ्लूचा विळखा पडलेला असताना शहरातील नेमक्या कोणत्या भागात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे,

Most spread of Sahkarnagar, Tilak road, Yerwada | सहकारनगर, टिळक रस्ता, येरवड्यात सर्वाधिक फैलाव

सहकारनगर, टिळक रस्ता, येरवड्यात सर्वाधिक फैलाव

पुणे : पुण्याला स्वाइन फ्लूचा विळखा पडलेला असताना शहरातील नेमक्या कोणत्या भागात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महापालिकेने मॅपिंग केले. यामध्ये सहकारनगर, टिळक रस्ता, येरवडा, बिबवेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये स्वाइन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेले ४७२ रुग्ण सापडले असून, त्यांपैकी ३४ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. शहरात कोणत्या भागात स्वाइन फ्लूचा जास्त प्रादुर्भाव आहे ती ठिकाणे शोधण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने पुणे महापालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार मॅपिंग करून ही ठिकाणे पालिकेने शोधली आहेत.
शहरात स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात झाला आहे. तेथे जानेवारीपासून आतापर्यंत लागण झालेले ६५ रुग्ण सापडले असून २ जणांचा बळी गेला आहे. यापाठोपाठ टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील २८ नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि त्यांपैकी ६ जणांचा बळी गेला आहे.
त्यापाठोपाठ संगमवाडी, येरवडा, हडपसर, बिबवेवाडी, कर्वे रस्ता या भागात स्वाइन फ्लूचा जास्त प्रादुर्भाव आहे. यामुळे तेथे बळीही गेले आहेत.
(प्रतिनिधी)

क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रादुर्भावाची स्थिती
क्षेत्रीय कार्यालयरुग्णबळी
संगमवाडी१२१
येरवडा२५२
ढोले-पाटील रस्ता९०
कसबा पेठ१४०
भवानी पेठ१४०
हडपसर४४१
बिबवेवाडी३८१
सहकारनगर६५२
टिळक रस्ता२८६
कर्वे रस्ता३७१
वारजे-कर्वेनगर१६०
औंध२३०
घोले रस्ता६०

Web Title: Most spread of Sahkarnagar, Tilak road, Yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.